औरंगाबाद - जिल्ह्यात मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालात कोरोनाचे नव्याने 68 रुग्ण वाढल्याचे समोर आले. सोमवारी दिवसभरात आतापर्यंतची रुग्णांची उच्चांकी संख्या पाहायला मिळाली. सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 350 नवे रुग्ण आढळून आले होते. जिल्ह्यातील सोमवारी सायंकाळ नंतर परीक्षण केलेल्या 1 हजार 32 स्वॅबपैकी 68 रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 8 हजार 882 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5 हजार 229 बरे झाले, 358 जणांचा मृत्यू झाला. तर 3 हजार 295 जणांवर उपचार सुरू आहेत.
शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर विशेष चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात असून केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सोमवारी 62 तर रात्री 4 रुग्ण असे 66 रुग्ण आढळून आले.
औरंगाबादेत कोरोनाचे 68 नवे रुग्ण; अँटीजेन तपासणीत रुग्णांच्या संख्येत वाढ - aurangabad covid 19 cases
औरंगाबाद जिल्ह्यातील सोमवारी सायंकाळ नंतर परीक्षण केलेल्या 1 हजार 32 स्वॅबपैकी 68 रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 8 हजार 882 कोरोनाबाधित आढळले आहेत.
सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मनपा हद्दीतील 17 नवे रुग्ण आढळून आले ज्यामध्ये घाटी परिसर (3), शंभू नगर (1), सादात नगर (1), रमा नगर (1), शिव नगर (1), इटखेडा (3), राजाबाजार (1), जाधवमंडी (2), जटवाडा रोड (1), किराडपुरा (1), दाना बाजार (1), एन दोन सिडको (1) या भागातील रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात 51 नवे रुग्ण आढळून आले ज्यामध्ये वाळूज (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), बजाज नगर (1), मारवाडी गल्ली, लासूरगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (5) स्वस्तिक नगर, बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (10), माळी गल्ली, रांजणगाव (1), दत्त नगर, रांजणगाव (1), मातोश्री नगर, रांजणगाव (1), आमे साई नगर, रांजणगाव (3), कृष्णा नगर, रांजणगाव (2), स्वस्तिक नगर, साजापूर (1), गणेश वसाहत, वाळूज (1), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (2), बापू नगर, रांजणगाव (4), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), अन्य (1), फर्दापूर, सोयगाव (6), जयसिंगनगर, गंगापूर (1), बोलठाण, गंगापूर (1), मारवाड गल्ली वैजापूर (1), कुंभार गल्ली, वैजापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
लॉकडाऊनचा पाचवा दिवस असून या पाच दिवसांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या चार दिवसांमध्ये असलेल्या बंदमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली तर बंद यशस्वी होईल असच म्हणावे लागेल.