औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी सकाळी 87 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 622 वर पोहोचली आहे. यापैकी 1 हजार 400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 135 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आता 1 हजार 87 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाचे 87 नवे रुग्ण; एकूण संख्या 2 हजार 622 वर - Aurangabad covid 19 cases
औरंगाबादमध्ये गुरुवारी 155, शुक्रवारी 105 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी मृतांची संख्या वाढली आहे. मागील 36 तासांमध्ये कोरोनाचे उपचार घेणाऱ्या सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), एन अकरा, हडको (1), एन सहा सिडको (2), मयूर नगर, एन अकरा (1), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर, एन दोन, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको एन अकरा (1), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्मिल्ला कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), हडको एन अकरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया विहार (3), एन नऊ सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2), एन दोन सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 60 पुरूष आणि 27 महिलांचा समावेश आहे.
रुग्णांच्या संख्येत रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गुरुवारी 155, शुक्रवारी 105 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी मृतांची संख्या वाढली आहे. मागील 36 तासांमध्ये कोरोनाचे उपचार घेणाऱ्या सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 135 वर पोहचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.