औरंगाबाद -जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 132 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 407 झाली आहे. यापैकी 1 हजार 317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, 121 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 969 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सर्वत्र मृत्यूचा दर 3 टक्क्यांच्या आसपास असताना औरंगाबादचा मृत्यू दर पाच टक्क्यांच्या वर आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये जयसिंगपुरा, बेगमपुरा (1), मिसरवाडी (1), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (1), उस्मानपुरा (2), एन आठ (1), जुना बाजार (1), आकाशवाणी परिसर (1), उल्कानगरी (1), संजय नगर (1), एन दोन सिडको (1), गणेश कॉलनी (1), बुड्डीलेन (1), बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), एमजीएम रुग्णालय परिसर (1), शिवाजी नगर (5), उत्तम नगर (3), कैलास नगर (7), गादिया विहार (1), सहकार नगर (1), नक्षत्रवाडी (1), चेलीपुरा (1), टी.व्ही सेंटर, पोलीस कॉलनी (1), संजय नगर, बायजीपुरा (1), एन सात सिडको (1), न्यायनगर (2), हुसेन कॉलनी (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), साईनगर, एन सहा (2), एन आठ सिडको, गजराज नगर (1), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (2), हरिप्रसाद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), पद्मपुरा (2), गांधी नगर (3), सिल्कमिल कॉलनी (1), विशाल नगर (3), बेगमपुरा (2), गोविंद नगर (1), समता नगर (1), फाजीलपुरा (4), न्यू हनुमान नगर (5), सिडको एन आठ (12), गौतम नगर, घाटी परिसर (2), रशीदपुरा (1), मयूर पार्क म्हसोबा नगर (1), भवानी नगर (2), भारतमाता नगर (3), विजय नगर (1), गारखेडा, गजानन नगर (1), कोहिनूर कॉलनी (1), जिल्हा परिषद परिसर (1), हर्सुल सावंगी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (3), टी व्ही सेंटर (1),बिस्मिला कॉलनी (3), सिडको वाळूज महानगर एक (2), एकता नगर, हर्सुल परिसर (1), बजाज नगर (7), साई नगर, पंढरपूर (3), जुनी मुकुंदवाडी (7), नारेगाव (1), गंगापूर (1), नायगाव (1), सिल्लोड (1), उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर (1), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 57 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबादेत 132 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ; एकूण रुग्ण संख्या 2407 वर - aurangabad covid 19 UPDATE
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून नागरिकांचा बाजार पेठेतील वावर वाढल्याचा परिणाम आता दिसायला सुरुवात झाला आहे. बुधवारी दिवसभरात 125 नवे रुग्ण आढळून आल्यानंतर आता गुरुवारी सकाळी 132 नवे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादेत 132 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ; एकूण रुग्ण संख्या 2407 वर
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून नागरिकांचा बाजार पेठेतील वावर वाढल्याचा परिणाम आता दिसायला सुरुवात झाला आहे. बुधवारी दिवसभरात 125 नवे रुग्ण आढळून आल्यानंतर आता गुरुवारी सकाळी 132 नवे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. तर मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2 हजार 407 रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून, मृतांची संख्या 121 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.