औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होता होत नाहीये. गुरुवारी सकाळी पुन्हा नव्याने कोरोना पॉझिटिव्ह 55 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या 743 वर जाऊन पोहचली आहे. 55 रुग्ण विविध 22 भागात आढळून आले असल्याने औरंगाबाद जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.
चिंताजनक... औरंगाबादमध्ये कोरोनाचे नवे 55 रुग्ण; एकूण संख्या पोहोचली 743 वर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून गुरुवारी 55 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 743 वर पोहोचली असून मृतांची संख्या 19 आहे.
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भीमनगर(15), पाडेगाव (1), उस्मानपुरा(7), सिल्कमिल्क कॉलनी (1), कांचनवाडी(1), नारळीबाग (1) , आरटीओ(2), गरम पाणी (1), बन्सीलाल नगर(1), सातारा(8), हुसेन कॉलनी(2), दत्त नगर(1), न्याय नगर(2), पुंडलिक नगर(1), संजय नगर - मुकुंदवाडी(3), गुरू नगर (1), नंदनवन कॉलनी(1), गारखेडा(1), शहनुरवाडी(1), पंचशील दरवाजा(1), बेगमपुरा(1), अन्य 2 या रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबादमध्ये मागील 15 दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जुन्या हॉटस्पॉटमध्ये नवीन भागांचा समावेश होत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहेत. दोन दिवसांमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 19 वर पोहचला आहे.