औरंगाबाद - जिल्ह्यात मंगळवारी सकाळी कोरोनाचे 51 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 73 वर पोहोचली आहे. यामध्ये 17 महिला आणि 34 पुरुषांचा समावेश आहे.
कोरोना अपडेट : औरंगाबादेत 51 रुग्णांची भर, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 हजार 73 वर - auranagabad corona update
औरंगाबादमध्ये रात्रीतून पुन्हा 51 रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 73 वर पोहोचली आहे. तर, जिल्ह्यात आत्तापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1), सादात नगर, गल्ली नं. 6(4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (4), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (1), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर(1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1) अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
सोमवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये मदनी चौक येथील 65 वर्षीय रुग्णाला 16 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उच्चरक्तदाब असल्याने या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, पैठणगेट येथील 56 वर्षीय महिलेला 16 तारखेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला मधुमेह असल्याने उपचारदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. तर बुढीलेन येथील 42 वर्षीय रुग्णाला 14 मे रोजी दाखल करण्यात आले होते. उच्चरक्त दाब आणि मधुमेह असल्याने उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर, औरंगाबाद जिल्ह्यात मृतांचा आकडा 34 वर गेला आहे.