औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी हटविणार आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार, अशी घोषणा दिली होती. मात्र, ही घोषणा फोल ठरली. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात सरकारची तिरडी काढून युवक राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवित आंदोलन केले.
बेरोजगारीच्या मुद्द्यावर औरंगाबादमध्ये सरकारची तिरडी काढून आंदोलन - तिरडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले होते. मात्र 2017-18 या वर्षातील बेरोजगारीचा दर 6.1% वर आला आहे. 45 वर्षात प्रथमच बेरोजगारीने नीचांक गाठला आहे. यामुळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवित आंदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध होतील, असे आश्वासन दिले होते. मात्र 2017-18 या वर्षातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर आला आहे. 45 वर्षात प्रथमच बेरोजगारीने नीचांक गाठला आहे. नवीन रोजगार नाही आणि जुन्या नोकऱ्या टिकवणे अवघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला.
आज दोन कोटी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. युवक उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळवण्यासाठी भटकत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकारची तिरडी काढून आंदोलन करण्यात आले.