महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Vice State President : मंत्री राजेश टोपे यांनी इतर जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष देऊ नये - राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष - NCP

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यावेळी त्यांना एक आमदार व तीन नगरसेवकांच्यावर आकडा गाठता आला नाही. औरंगाबाद शहरामध्ये राष्ट्रवादी पक्ष सक्षम करण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. मात्र, मंत्री राजेश टोपे हे औरंगाबादच्या राजकारणार लक्ष दिल्याने भविष्यात राष्ट्रवादी पक्षाच्या अपयशाला राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) जबाबदार असतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मौलाना कदिर ( NCP Vice State President Kadir Maulan ) म्हणाले.

कादिर मौलाना
कादिर मौलाना

By

Published : Mar 20, 2022, 5:59 PM IST

औरंगाबाद - आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) यांनी स्वतःचा मतदारसंघ सोडून इतर जिल्ह्यात राजकारणात लक्ष देऊ नये, असा घरचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मौलाना कदिर ( NCP Vice State President Kadir Maulana ) यांनी टोपे यांना दिला आहे.

राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष

...तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अपयशाला टोपे जबाबदार असतील - 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यावेळी त्यांना एक आमदार व तीन नगरसेवकांच्यावर आकडा गाठता आला नाही. औरंगाबाद शहरामध्ये राष्ट्रवादी पक्ष सक्षम करण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. मात्र, मंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) हे औरंगाबादच्या राजकारणार लक्ष दिल्याने भविष्यात राष्ट्रवादी पक्षाच्या अपयशाला राजेश टोपे जबाबदार असतील, असेही मौलाना कदिर ( NCP Vice State President Kadir Maulana ) म्हणाले.

जलील यांच्या पायाखालची वाळू सरकली -एमआयएमच्या ( AIMIM ) अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत ( NCP ) प्रवेश केला आहे. तसेच एमआयएमचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jaleel ) यांच्या पायाखालची वाळून सरकली आहे. आईच्या निधनाला दहा दिवसही होत नाहीत आणि सांत्वनाचे राजकारण जलील यांच्याकडून केले जात असल्याची खंत वाटत आहे, अशी प्रतिक्रिया कदिर यांनी दिली.

मंत्री टोपे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार - मंत्री राजेश टोपे हे स्वतःचे मतदारसंघ सोडून औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष देत आहेत. मात्र, खासदार जलील ( MP Imtiaz Jaleel ) हे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. म्हणून याबाबत शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती कदिर यांनी दिली.

हेही वाचा -शिवसेनेचे हिंदुत्व ढोंगीपणाचे.. भाजप आमदार श्वेता महाले सेना, मलिकांवर कडाडल्या

ABOUT THE AUTHOR

...view details