महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत घर मागणाऱ्या शिवसेना आमदाराविरोधात राष्ट्रवादीचे भीक मागो आंदोलन

मुंबईत घर मागणाऱ्या एका शिवसेना आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कन्नड तालुक्याचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत (MLA Udaysingh Rajput) यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले.

ncp protest
राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : Mar 28, 2022, 6:19 PM IST

Updated : Mar 28, 2022, 9:25 PM IST

औरंगाबाद - मुंबईत आमदारांना घर देण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईत घर मागणाऱ्या एका शिवसेना आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कन्नड तालुक्याचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत (MLA Udaysingh Rajput) यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विधानसभेत राजपूत यांनी आमदारांना घर देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादीचे भीक मागो आंदोलन

मोफत घर देण्यासाठी मागितली भीक :राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना घर देण्यासाठी घोषणा केली. मात्र, त्यावेळी विधानसभेत शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी मुंबईत घर देण्याची मागणी केली. एकीकेडे कन्नड तालुक्यात अनेक नागरिक घरकुल योजनेपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी मागणी करण्याऐवजी आमदार स्वतः साठी घर मागत आहेत. त्यांच्या कृतीने कन्नड तालुक्याची लाज घालवली, असा आरोप करत राष्ट्रवादी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार राजपूत विरोधात घरासाठी पैसे जमावण्यासाठी भीक मागो आंदोलन केले.

शासकीय कार्यालयात मागितली भीक :शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत अनेक ठिकाणी पैसे मागत असतात. त्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्या, त्यांना पैसे देणाऱ्या तहसीलदार, तलाठी, शासकीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन भीक मागितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्याबाबत मागील अडीच वर्षात एकही शब्द काढला नाही, आणि घर मागताना मात्र सगळ्यात पुढे, यामुळे आमचा राग असल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी संगितले.

Last Updated : Mar 28, 2022, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details