औरंगाबाद- कोरोनाग्रस्त असलेल्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत कामावर असल्याचे दाखवून या योजनेतून भ्रष्टाचार केले जात असल्याचा आरोप राष्ट्रावादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्याच मतदार संघात घडला आहे.
काम जानेवारीतच पूर्ण पण हजेरी सुरूच
औरंगाबाद-बीड महामार्गावरील बायपास साजेगाव रोड या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून विविध यंत्र प्रणाली वापरून जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप हे काम सुरू असून या कामासाठी पाच जणांची हजेरी सुरूच आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी काही जण कोरोनाग्रस्त असून त्या काळातही त्यांची हजेरी लावण्यात आली आहे, असा आरोप गोर्डे यांनी केला आहे.