औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झंझावाती दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी पवार हे औरंगाबाद येथे होते. पुलवामा हल्ल्यानंतर देशातील वातावरण बदलले. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या आगोदर पुलवामा हल्ला घडला आणि भाजप सरकारने त्याचा फायदा करून घेतला, यावेळी जर विधानसभा निवडणुकीआधी असा काही प्रकार घडला नाही तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार यांनी पुलवामावर भाष्य केले आहे.
पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार हेही वाचा - नाशिक दौऱ्यात मोदींनी युतीचा ‘य’ सुद्धा उच्चारला नाही- अमोल कोल्हे
पवार म्हणाले, माझ्याकडे संरक्षण खात होतं. पुलवामा घटनेनंतर मी काही निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी त्यांनी शंका व्यक्त केली की, हा हल्ला जाणून बुजून केला होता की यामागे पाकिस्तानचा उद्योग होता याच्या खोलात जाण्याची गरज असल्याचे अधिकारी म्हणाले. अयोध्या राम मंदिरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशित सभेत जो चिमटा काढला, तो त्यांचा मित्र पक्ष शिवसेनेला तो एक इशाराच असल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाच्या प्रक्रियेत मी नाही, मात्र, काही जागांची अदलाबदल बाबत चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - 'शेवटच्या श्वासापर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची चौकशी झाल्यानंतर ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. तसेच विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतही मनसे संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, पवार म्हणाले मनसेला सोबत घेण्याबाबत माझी इच्छा होती, मात्र काँग्रेसची इच्छा नसल्याने आम्ही या मुद्दयाबाबत ताणत बसलो नाही. वंचित आणि एमआयएम एकत्र येण हे भाजपला फायद्याचं असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मनसे मुंबई विभाग अध्यक्षांची शुक्रवारी बैठक, विधानसभेबाबत निर्णयाची शक्यता?
नाशिक येथील मोदी यांच्या भाषणावर पवार म्हणाले, "पंतप्रधान आपल्या भाषणात शेती आणि उद्योगातील मंदी यावर बोलतील असे वाटले होते मात्र, त्यांनी काहीही भाष्य केले नाही. तसेच मंदी कशी थांबणार आहे? काय उपाययोजना चालू आहेत. यावर एक शब्द काढला नाही. यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आता हे स्पष्ट झाले आहे." तसेच पवार म्हणाले, माझ्यावर मुख्यमंत्री बोलत होते ते कमी पडले म्हणुन त्यांनी पंतप्रधानांना बोलावले. मला वाटलं ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर बोलतील. मात्र, ते देखील माझ्यावर बोलले म्हणजे आमचं चांगलं चाललं आहे असं समजायला काही हरकत नाही.