महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदाराला डावलली उमेदवारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र - युवराज चावरे

युवराज चावरे, असे रक्ताने पत्र लिहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र

By

Published : Oct 6, 2019, 9:59 PM IST

Updated : Oct 6, 2019, 11:24 PM IST

औरंगाबाद- निवडणुकीच्या काळात आपल्या नेत्याची उमेदवारी डावलल्यावर कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन, पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी, अन्यथा वेग-वेगळ्या मार्गाने नाराजी व्यक्त करतात. मात्र, पैठण विधानसभा मतदारसंघातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क रक्ताने पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र

हेही वाचा - कर्णपुरा यात्रेत पायी जाणाऱ्या ६ मित्रांना भरधाव बसची धडक; एकाचा मृत्यू

युवराज चावरे, असे रक्ताने पत्र लिहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी आहे. पैठण येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षापासून पक्षवाडी काम केले. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र लिहले आहे.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यातील 'या' देवी मंदिरात होते नवकन्येचे पूजन, नवरात्रौत्सवात बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश

Last Updated : Oct 6, 2019, 11:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details