औरंगाबाद -उदयनराजेंना जर कोणी पुरावे मागत असतील तर त्यांनी ते दिले पाहिजे. तंगडी तोडण्याची भाषा कोणीही करू नये. अनेक राजघराण्यांमध्ये दत्तक घेतलेले राजे आहेत, असे वक्तव्य करत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची पाठराखण केली.
नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री जनतेने ज्या पद्धतीने उदयनराजेंना पराभूत केले, यातून ते अद्याप बाहेर निघालेले नाहीत. भाजप महाराजांचा अपमान करत आहे. भाजपच्या माजी आमदाराने महाराजांची तुलना मोदींशी झाल्याने महाराजांची उंची वाढल्याचे वक्तव्य केले. अशा आमदारांना पाठीशी घालणे योग्य नाही. याला उदयन राजेंनी उत्तर दिले पाहिजे. मात्र, भाजपकडून काही मिळेल या आशेमुळे राजे लाचारी पत्करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा - 'तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी तंगड्या सर्वांनाच असतात हे लक्षात ठेवा'
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत बोलताना लाड यांनी काय केले हे त्यांना माहीत आहे. मी जास्त बोललो तर ते अडचणीत येतील, असा टोला नवाब मलिक यांनी लावला. शरद पवारांना जाणता राजा म्हणतात. जाणता राजा म्हणजे सर्वांचे प्रश्न माहीत असणारा होय. पवार साहेबांना जनतेचे सर्व प्रश्न माहीत आहेत आणि ते सोडवू शकतात. त्यामुळे त्यांना लोक जाणता राजा म्हणतात. पावर साहेबांनी कधी स्वतःला जाणता राजा म्हणलेले नाही. मात्र, भाजपवाले मोदींची तुलना थेट महाराजांसोबत करत आहेत, हा महाराजांचा अवमान आहे. राजेंनी त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. परंतु, भाजपकडून काहीतरी मिळेल म्हणून ते लाचारी पत्करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. संजय राऊत पत्रकार आहेत आणि जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर, त्याचे उत्तर दिले पाहिजे असे देखील मलिक यावेळी म्हणाले.
हेही वाचा - उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक