महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींनी सरकारी कंपन्या बुडवून खासगी कंपन्यांचा फायदा केला- नवज्योतसिंग सिद्धू - Navajyot Sing Sidhu

नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्यांना तोट्यात आणून अंबानी, अदानी यांच्यासारख्या ऊद्योजकांच्या खासगी कंपन्यांना फायदा मिळवून दिला, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला.

नवज्योतसिंग सिद्धू

By

Published : Apr 20, 2019, 10:48 PM IST


औरंगाबाद - काँग्रेस लोकसभा उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू औरंगाबादेत आले होते. पैठण गेट ते किराडपुरा असा रोड शो करत त्यांनी किराडपुरा येथे सभा घेतली. या सभेत मोदी यांच्यावर त्यांनी घणाघाती आरोप केले.

शेतकऱ्याने दोन लाखांचं कर्ज घेऊन दोन हजारांचा हप्ता थकवला तर जातो, मात्र हेच अंबानींना दिलेलं कर्ज माफ करतात. पोटात अन्न नाही आणि लोकांना योग कार्याला सांगतात. खिश्यात पैसे नाहीत आणि लोकांना बँकेत खात उघडायला सांगतात. गावात पाणी नाही, तरी डिजिटल इंडिया तयार करायला जात असल्याची टीकादेखील सिद्धू यांनी मोदींवर केली.

नवज्योतसिंग सिद्धू, औरंगाबाद रॅली

मोदींनी ३७० वचने जनतेला दिली आहेत. त्यापैकी एक जरी वचन पूर्ण केलं असेल तर मी राजकारण सोडतो, असं आव्हान नवज्योतसिंग सिद्धू यांनी यावेळी दिल. 'ना राम मिला, ना रोजगार मिला, हरगलीमे मोबाईल खेलता बेरोजगार मिला', असं म्हणत मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात वर्णन केलं. मोदी येण्याच्या आधी संविधान तयार झालं आहे. मोदींना आणि भक्तांना वाटत २०१४ च्या आधी भारत नव्हता, फक्त एक चहाची दुकान आणि एक रेल्वेस्टेशन होते, त्यांनी सर्व खोदून काढलं अस त्यांना वाटतं, हे जेव्हा चड्डीत होते त्यावेळी नेहरूंनी अंतराळात यान पाठवलं , असं सांगत मोदींची खिल्ली उडवली. हे चौकीदार आहेत, तेही चोर आहेत. चौकीदार कधी गरीबाच्या, शेतकऱ्याच्या दारात उभा राहिलेला पहिला का? तो फक्त श्रीमंतांच्या दारात उभं राहून गरिबांच्या पोटावर लाथ मारतो, अशी टीका देखील काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी औरंगाबादेत केली. औरंगाबादकरांच्या प्रेमाने भारावून गेलो असून 'बुरे दिन जानेवाले है और राहुल गांधी आनेवाले है' असं म्हणत संविधान आणि देशासाठी मतदान करा असं, आवाहन मतदारांना नवज्योतसिंह सिद्धू यांनी केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details