महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निमित्त उद्घाटनाचे, अजेंडा विधानसभेचा; नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला राज्य दौऱ्यावर

औरंगाबाद-दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहत ऑरिकच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि बचत गटाच्या महिलांचा मेळावा देखील शनिवार, दिनांक 7 सप्टेंबर रोजी शेंद्रा येथे होणार आहे.

नरेंद्र मोदी

By

Published : Sep 3, 2019, 4:12 PM IST

Updated : Sep 3, 2019, 5:46 PM IST

औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी 7 सप्टेंबर रोजी मुंबई-औरंगाबाद-नागपूर असा दौरा नरेंद्र मोदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मोदी फोडणार असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा-शिवसेनेत होणारे इन कमिंग स्कील बेस - आदित्य ठाकरे

औरंगाबाद-दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहत ऑरिकच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि बचत गटाच्या महिलांचा मेळावा देखील शनिवार, दिनांक 7 सप्टेंबर रोजी शेंद्रा येथे होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य आणि केंद्रातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

देशातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक वसाहतीचे मोदींच्या हस्ते लोकार्पण-

औरंगाबादच्या 'ऑरिक सिटी' या भारताच्या पहिल्या स्मार्ट औद्योगिक वसाहतीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. काही मोठ्या उद्योग कंपन्यांनी इथे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. 'ऑरिक सिटी'च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री औरंगाबादच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांचा औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुपारी दोनच्या सुमारास कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Sep 3, 2019, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details