धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लीन चिट नागपूर :नागपूर पोलिसांनी बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात कोणाताही पुरावा नसल्याने त्यांना क्लीन चिट दिल्याचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुढचे पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
धीरेंद्र शास्त्रींनी गुन्हा केला :नागपूर शहर पोलिसांना बागेश्वर धाम मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधातील तपासात काहीचं आक्षेपार्ह आढळले नाही असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. तरी, याला क्लीन चिट देण्यात आली असे म्हणणे योग्य होणार नाही असे श्याम मानव म्हणाले आहेत. पोलीस आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली हे एका अर्थाने चांगले झाले. कारण जादूटोणा कायदा अंमलबजावणी अंतर्गत त्यांना काय कारवाई झाली याची लिखित माहिती मागवली जाणार होती. हा कायदा मी तयार केला आहे. त्यामुळे यामध्ये काय आहे, काय नाही याची खडा न खडा माहिती माझ्याकडे आहे. नागपूरमध्ये त्यांनी दिव्य दरबार भरला होता, त्यामुळे हा कायदा लागू होतो असे शाम मानव म्हणाले.
कागदावर सोडवतात प्रश्न : धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांचे मन वाचत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामच्या दैवी दरबारात एकदा अर्ज केला की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे. महाराज लोकांच्या समस्या त्यांना न सांगता वाचून घेतात. नंतर लवकरच तुमची समस्या दूर होईल असे कागदावर सोडवतात. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार हे सिद्ध स्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. मोठ्या संख्येने लोक बागेश्वर धामच्या दरबारात पोहोचून अर्ज करतात. पण बाबांना लोकांचे मन कसे कळणार हा मोठा प्रश्न आहे.
इथून सुरू झाला होता वाद : रामकथा सुरू असताना धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी अनेकांना त्यांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर त्या व्यक्तीने काहीही सांगण्याच्यापूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी व्यासपीठावर आलेल्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या, प्रश्न एका कागदावर लिहून काढल्या. इथूनच खरा वाद सुरू झाला. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला असा आरोप श्याम मानव, त्याच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. श्याम मानव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर न देताचं पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्रीचा निर्धारित दौरा नऊ दिवसांच्या होता. तो दोन दिवस आधीच गुंडाळून नागपुरातुन काढता पाय घेतला असे आरोप सुरू झाले.
हेही वाचा -Devendra Fadnavis on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा एकदा गाजर, पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?