छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत सावरकर गौरव यात्रा काढण्याची भाजपने घोषणा केली. मात्र, याआधी देखील महापुरुषांचे अवमान झाले आहेत. आज सावरकर गौरव यात्रा काढणारे नेते त्यावेळी कुठे गेले होते? असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत भाजप, शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. याआधी काही महापुरुषांना अनुसरून विवादित वक्तव्ये केली गेली. त्यावेळेस का पुढे आले नाही? आम्हाला सावरकरांचा सन्मान ठेवता येतो, मात्र ही यात्रा आजच का? आमची सभा आहे म्हणून हे करत आहेत. नागरिकांना हे कळत असून तेच अशा नेत्यांना उत्तर देतील, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
Chandrakant Khaire On Assembly Seats : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 200 हून अधिक जागा मिळतील; खैरेंचे भाकीत - Khaire On MVA Legislative Assembly Seats
महाविकास आघाडीच्या विधानसभेत दोनशेहून अधिक तर लोकसभेत 38 जागा येतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. रविवारी भाजप-शिंदे गटाने सकाळपासूनच सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी सभा असल्याचे औचित्य साधून भाजप-शिंदे गटाकडून नेमकी त्याच वेळेला जाणीवपूर्वक ही गौरव यात्रा काढली जात असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. त्यांना याचे उत्तर संध्याकाळी मी माझ्या भाषणातून देईल असेही ते म्हणाले.
सावरकर पकडायचे की सोडायचे?ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाला निशाणा केला होता. मात्र राऊत यांच्या चेहऱ्यावर सावरकरांचा द्वेष दिसून येत आहे. सावरकर यांना जवळ करायचा का दूर? याबाबत कळत नाही. महाविकास आघाडीला प्रश्न विचारा की, सावरकर कोण आहे हे? असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांना दंगलीचे गांभीर्य ओळखता येत नाही, पोलीस अधिकाऱ्यांनी पण दंगल घडवण्यासाठी बाहेरून लोक आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना हे कळत नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तर खासदार इम्तियाज जलील यांनी माजी न्यायाधीशांच्या मार्फत दंगलीची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर बोलताना जलील यांच्या सांगण्यावरून सगळे होणार नाही, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी केले.
जंगली रंगली बॅनरबाजी:शहरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे बॅनर जागोजागी लावण्यात आले आहेत. मात्र त्याच ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशी टीका करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळपासून या बॅनरबाजीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये दिसून आली. दिवस-रात्र टीव्हीसमोर वक्तव्य करणाऱ्यांनी खोडसाळपणे हे सर्व केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाठ यांच्यावर निशाणा साधत केला.
हेही वाचा:Indian MP Reply to Germany : राहुल गांधींच्या प्रकरणात बोलणाऱ्या जर्मनीला भाजप खासदाराने दिले जोरदार प्रत्त्युत्तर...