औरंगाबाद - जिल्ह्यातील अजिंठा येथील मुस्लीम धर्मियांचा मोहरम सण हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. यावेळी सणादरम्यान अजिंठा येथे 57 सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. ज्यामध्ये 6 सवाऱ्या हिंदू बांधवानी काढलेल्या होत्या. असा हा एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मोहरम सण पाहण्यासाठी बऱ्हाणपुर, मालेगाव, मुंबई, नाशिक, धुळे, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि अकोला इ. ठिकाणांहून नागरिक येतात.
हेही वाचा -विघ्नहर्ता तू एक तुझे रूप अनेक...
यावेळी सवारी सोबत ताजिया, बुराख बीबी, मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ९ वाजता इंमाम वाड्यातून इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. हुसेनी मोहल्यातून दुपारनंतर सर्व सवाऱ्या गांधी चौकात एकत्र आल्यानंतर या सवारींची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यानंतर पावणे गांधी चौकातून सर्व सवाऱ्या विसर्जनासाठी एकत्र येऊन मिरवणुक वेगाने पुढे सरकली.