महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder Of Girl Student : भरदिवसा 200 फुट ओढत नेऊन विद्यार्थिनीची हत्या

कॉलेजजवळून भरदिवसा 200 फुट ओढत नेऊन विद्यार्थिनीची हत्या (Murder of a student by dragging her 200 feet) करण्यात आली आहे. ग्रंथी सुखप्रित कौर अस युवतीचे नाव असून एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Murder Of Girl Student
विद्यार्थिनीची हत्या

By

Published : May 21, 2022, 6:21 PM IST

औरंगाबाद:देवगिरी महाविदयालय जवळ भरदिवसा तरुणीची भोसकून हत्या झाल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. ग्रंथी सुखप्रित कौर ही 19 वर्षीय विद्यार्थींनी बीबीएच्या प्रथम वर्गात (In the first class of BBA) शिकत होती. तीला तीच्या मित्राने सुमारे 200 फुट ओढत नेले आणि तीची महाविद्यालय परिसरातच हत्या केली घटना स्थळाच्या भागातील सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

प्रथमदर्शनी शरण सिंह नावाच्या युवकाने तीची हत्या केल्याचा संशय आहे. शरण सिंह आणि ग्रंथी हे दोघेही एकाच परिसरात राहणारे असून एकमेकांना ते ओळखत होते. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. वेदांतनगर पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. भर दिवसा गजबजलेल्या महाविद्यालय परिसरातुन विद्यार्थिनींला ओढत नेत तीची हत्या झाल्याची माहिती शहरात वेगात पसरली या घटने मुळे विद्यार्थी तसेच पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : Woman Stabbed : जळगावातील आशाबाबा नगर येथे महिलेवर चाकूने वार

ABOUT THE AUTHOR

...view details