औरंगाबाद - शहरातील सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 9 जून) रात्री ही घटना उघडकीस आली. याबाबत सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण लालचंद राजपूत (वय 19 वर्षे) आणि सौरभ लालचंद राजपूत (वय 17 वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळून आले असून, दोघांचाही गळा चिरून त्यांच्या हत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.
सातारा परिसरात राहणारे लालचंद राजपूत कामानिमित्त पत्नी आणि मोठ्या मुलीसह जालना येथे गेले होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ते परत घरी आले, त्यावेळी घरात कोणाचीही हालचाल दिसून आली नाही. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरातील सर्व रूममध्ये कोणीही आढळून आले नाही. बाथरूमकडे त्यांनी तपासले असता, दोघांचेही मृतदेह आढळून आले. दोघांच्या गळ्यावर वार केलेले आढळून आले. आपल्या मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. परिसरातील लोक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले आहेत.
धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या - murder news
औरंगाबाद शहराच्या सातारा परिसरात बहीण-भावाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत बहिण-भाऊ
याप्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लालचंद राजपूत ही पुण्याच्या मॉडर्न कॉलेज येथे शिक्षण घेत होती, तर भाऊ सौरभ राजपूत हा दहावीत होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून सातारा पोलीस याबाबत तपास करत आहेत.
हेही वाचा -कन्नड तालुक्यातील मेहेगाव येथे काकाने केला पुतण्याचा खून
Last Updated : Jun 10, 2020, 8:33 AM IST