महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder in Aurangabad : तरुणाची दगडाने ठेचून हत्या; मृतदेहासोबत केले असे काही - हत्येनंतर गुप्तांग जाळले

तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिद्धार्थ भगवान साळवे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील मुख्य टीव्ही सेंटर भागातील मैदानात ही घटना घडली. हत्येत एकापेक्षा अधिक मारेकऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचा संशय आहे. हत्येला 24 तासापेक्षा जास्त वेळ उलटून गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

तरुणाची दगडाने ठेचून हत्या
तरुणाची दगडाने ठेचून हत्या

By

Published : Jan 21, 2022, 1:22 PM IST

Updated : Jan 21, 2022, 8:54 PM IST

औरंगाबाद -टिव्ही सेंटर येथील स्टेडियममध्ये ३३ वर्षीय मजुराचा दगडाने ठेचून खून ( Murder of a youth in Aurangabad ) करून मृतला जाळण्याचा प्रयत्न देखील केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पत्नीला करत होता मारहाण -

सिद्धार्थ भगवान साळवे (वय ३३ रा. हिवरा तालुका जाफराबाद, हल्ली मुक्काम सिद्धार्थ नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिद्धार्थ हा मोलमजुरी काम करत होता. त्याचा १३ वर्षापूर्वी सिद्धार्थ नगर येथील अनिता यांच्याशी विवाह झाला होता. त्याला एक ११ वर्षाचा मुलगा आहे. पत्नी एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे. पत्नीने काम करत असलेल्या हॉस्पिटलजवळ किरायाची खोली घेतली होती. मात्र तिथेही सिद्धार्थ दारू पिऊन गोंधळ घालत होता. तसेच अनिताला मारहाण करत असल्याने घर खाली करण्याचे घरमालकाने सांगितले. यामुळे त्यांनी घर खाली केले होते. सततचा त्रास होत असल्याने भाऊ व आईने माहेरी राहण्याचा सल्ला दिला. गेल्या काही दिवसांपासून अनिता या माहेरी राहत होत्या.

स्टेडियममध्ये आढळला मृत्यदेह -

दरम्यान १९ तारखेला सासूच्या घरी आला होता. यावेळी सासरच्यांनी तू मुलीला त्रास देतो. आता कशाला आला. त्यानंतर सिद्धार्थ हा परत गेला. गुरुवार रात्री नऊ वाजता अनिता दवाखान्यातून घरी जात असताना दिसला होता. यावेळी दोघेही एकमेकांना बोलले नाही. त्यानंतर अनिता या घरी गेल्याच त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान आज सकाळी नागरिक ग्राउंडमध्ये आल्यानंतर घटना उघडकीस आली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा -Naxals burn Vehicles : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ; रस्त्यांच्या कामाला विरोध

Last Updated : Jan 21, 2022, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details