औरंगाबाद:शामसुंदर कलंत्री हे व्यवसायिक होते. पुंडपिकनगर (Pundlik Nagar area) गल्ली क्रमांक 4 मध्ये मारोती मंदिराच्या बाजूला त्यांचे दुकान आणि घर आहे. गेल्या दोन दिवसांपासून घरातून वास येत होता. रविवारी रात्री वास अधिक तीव्र झाल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी पाहणी केली असताना शामसुंदर आणि किरण कलंत्री यांचे मृतदेह (Murder of a couple) दिसून आले.
Murder Of A Couple : पुंडलिकनगर भागात दाम्पत्याची हत्या, संशयाची सुई मुलावर - Pundlik Nagar area
शनिवारी महाविद्यालयीन युवतीची हत्या झाल्या शहरात पुंडलिकनगर भागात (Pundlik Nagar area) दाम्पत्याची हत्या (Murder of a couple) झाल्याचे उघड झाले आहे. शामसुंदर कलंत्री आणि किरण कलंत्री असे जोडप्याचे नाव असून पोलिस मारेकऱ्याचा तपास करत आहेत. घटना घडल्या पासून या दाम्पत्याचा मुलगा गायब असल्यामुळे त्याच्यावर संशय ( suspicion on child) व्यक्त होत आहे.
शामसुंदर यांचा मृतदेह गॅलरीत तर किरण यांचा मृतदेह पोत्यात सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. शामसुंदर यांचे तीन लग्न झाले होते. किरण ही त्यांची तिसरी पत्नी होती. त्यांना पहिल्या पत्नीपासून मुलगा आकाश तर तिसरी पत्नी किरण यांच्यापासून मुलगी आहे. मुलगी शिक्षणासाठी बाहेर राहते. या हत्यानंतर आकाश गायब झाला आहे. वैष्णवी ने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी आकाशने आवाज बदलून वडील असल्याचे भासवल, आणि गावाला जात आहोत घरी येऊ नको असे सांगितले. त्यामुळे आकाशवर संशयाची सुई ( suspicion on child) असून पोलिस आधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :Accused Arrested in Nashik : औरंगाबाद येथील तरुणीच्या हत्येतील आरोपीला नाशिक मध्ये अटक; एकतर्फी प्रेमातून केली होती हत्या...