औरंगाबाद- येथे मनपा कर्मचाऱ्यांचे केलेल्या विकास कामांचे पैसे मिळवण्यासाठी गेल्या 48 दिवसांपासून कंत्राटदार मनपासमोर आंदोलन करीत आहे. संतप्त कंत्राटदारांनी मनपा मुख्यालय गेट समोर महापौर नंदकुमार घोडेले यांची गाडी अडवली. येत्या दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर कंत्राटदारांनी माघार घेतली.
बिले थकल्याने मनपा कंत्राटदारांनी अडवली महापौरांची गाडी - contracter andolan aurangabad news
मनपा अंतर्गत येणाऱ्या विविध वार्डात केलेल्या विकास कामांचे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची देयके मनपाकडे थकलेले आहे. केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार गेल्या 48 दिवसांपासून मनपासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत.
![बिले थकल्याने मनपा कंत्राटदारांनी अडवली महापौरांची गाडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5119760-thumbnail-3x2-aur.jpg)
हेही वाचा-'शिवसेनेशिवाय राज्यात सरकार नाही व मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच'
मनपा अंतर्गत येणाऱ्या विविध वार्डात केलेल्या विकास कामांचे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची देयके मनपाकडे थकलेले आहे. केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार गेल्या 48 दिवसांपासून मनपासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत. यानंतरही यासंबंधी प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे कंत्राटदाराकडून असंतोष व्यक्त केल्या जात आहे. आज मंगळवारी मनपाची सर्वसाधारण सभा असल्याने सकाळी महापौर घोडेले हे मनपात येत असताना, मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच कंत्राटदारांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर गाडीतून उतरत कंत्राटदारांशी महापौरांनी चर्चा केली. येत्या दोन ते तीन दिवसात हा प्रश्न मार्ग काढण्याचे आश्वासन महापौर घोडेले यांनी दिले. यानंतर कंत्राटदारांनी महापौरांचे वाहन जाण्याकरिता जागा करून दिली. यावेळी बबन हिवाळे, शेख मुजाहिद शेख सादिक, दिनेश नरवडे, अभिषेक सुरडकर, विजयसिंग परदेशी, विजय मगरे, बंडू भिंगारदेव साईनाथ पवार, रामदास गाडेकर, प्रकाश वाणी आदींची उपस्थिती होती.