औरंगाबाद - येथील शेख मुदस्सीर यांनी एका मिनिटात 121 पुशअप विथ क्लॅपिंग नवा विक्रम केला आहे. त्यांनी केलेल्या या केलेल्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
औरंगाबादच्या शेख मुदस्सीर यांनी केला 'हा' नवा विश्वविक्रम... - शेख मुदस्सीर विश्वविक्रम
शेख मुदस्सीर यांनी इंग्लंडच्या स्टीवन बटलरचा एक मिनिटात 90 पुशअप विथ क्लॅपिंगचा विक्रम मोडीत काढत एका मिनिटात 121 पुशअप विथ क्लॅपिंगचा नवा विश्वविक्रम नोंदवला.
मुदस्सीर औरंगाबादच्या विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्रजी शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंग्लंडच्या स्टीवन बटलरचा एक मिनिटात 90 पुशअप विथ क्लॅपिंगचा विक्रम मोडीत काढत एका मिनिटात 121 पुशअप विथ क्लॅपिंगचा नवा विश्वविक्रम नोंदवला.
पुशअप विथ क्लॅपिंग हा अतिशय अवघड प्रकार मानला जातो. पुशअप करताना टाळी वाजवावी लागत असल्याने तोल जाण्याची भीती असते. मात्र नव्या विक्रमासाठी शेख मुदस्सीर यांनी पाच महिने अथक परिश्रम केले होते. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाचे नाव उंचावण्यासाठी त्यांनी हा विक्रम केला. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त त्यासाठी तुमच्यात बळ आणि नवीन स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती हवी, अशी प्रतिक्रिया शेख मुदस्सीर यांनी विक्रम नोंदवल्यावर यांनी दिली. याआधी शेख मुदस्सीर यांनी 2013 साली पुशपचे दोन नवीन विक्रम देखील आपल्या नावावर नोंदविले आहे.