औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या जवळपास १ हजार २३५ जणांना पुन्हा नोटीस बजावत नव्याने जामीन घेण्यास सांगितल्याने मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे.
औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनातील १ हजार २३५ जणांना पुन्हा नोटीसा - गुन्हा
2019-03-29 13:59:07
निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने नोटीस बजावल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रोष व्यक्त केलाय.
नोटीसमध्ये विविध पोलीस ठाण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी मोर्चातील बांधवाना जामीनदारासह २५ हजारांचा जामीन भरणे आणि तुम्हाला बंदपत्र का करू नये, यांसंबंधी औरंगाबादमधील जवळपास १ हजार २३५ जणांना ही नोटीस देण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. आंदोलकांवर असणारे किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. गुन्हे मागे घेतले गेले नाहीत मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने नोटीस बजावल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रोष व्यक्त केलाय. याप्रकरणी प्रशासनाने आमची फसवणूक केल्याची भावना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केली.
शांततेत असलेल्या मोर्चाने आक्रमक रुप घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चातील अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली होती.