औरंगाबाद- नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयी मिरवणुकीत पाण्याचा अपव्यय झाल्याचे समोर आले आहे. शहरातील जुन्या भागात मिरवणूक काढत असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात रंग टाकून टँकरमधील पाणी लोकांवर टाकत पाण्याची नासाडी केली. या कृतीमुळे विरोधकांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ऐन पावसाळ्यात दुष्काळाची झळ औरंगाबादकरांना बसत आहे. शहराववर टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. अशामध्ये एमआयएमकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्यात आला. याबरोबरच ज्या खासदाराच्या विजयी रॅलीत पाण्याचा अपव्यय करण्यात आला. त्याच खासदाराने लोकसभेत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.