औरंगाबाद- खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये जिल्ह्यातील वैद्यकीय उपचारासाठी दिले आहेत. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले आहे. मराठवाड्यातील बहुतांश खासदारांनी कोरोनाच्या अनुषंगाने एक कोटींचा मदत निधी शासनाला दिला आहे. मात्र, माझा निधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि उपाय योजनेसाठी माझ्याच मतदारसंघात खर्च करत असाल तरच मी निधी देईन, अशी भूमिका औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतली होती.
खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून एक कोटींची मदत - इम्तियाज जलील यांची मदत
खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये जिल्ह्यातील वैद्यकीय उपचारासाठी दिले आहेत. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय आणि इतर सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वच लोक प्रतिनिधींनी आपल्या विकास निधीतून काही पैसे मदतनिधी म्हणून जाहीर केला आहे. मराठवाड्यातील खासदारांनी आपल्या निधीतून एक कोटींचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधी दिली आहे. मदतनिधी देताना औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी माझा निधी माझ्या मतदारसंघातील वैद्यकीय यंत्रणेसाठी वापरण्यात यावा, अशी अट ठेवली होती. त्यानुसार त्यांनी एक कोटींचा मदत निधी देत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले.
या पत्रात प्रत्येक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 10 लाख आणि शहरातील जिल्हा रूग्णालयांसाठी 50 लाख देण्याचे नमूद केले आहे. त्यानुसार आता ही रक्कम खर्च केली जाईल, असा विश्वास औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.