औरंगाबाद - करमाडजवळ झालेला अपघात नाही तर हत्या असल्याचा आरोप करत या हत्येसाठी रेल्वे विभागासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली. इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी भेट घेत नांदेडहून आलेल्या अधिकाऱ्यांसमोर रोषव्यक्त केला आहे.
...ही तर सरकारने केलेली हत्या; नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा - एमआयएम खासदार
मध्य प्रदेश सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केल्यावर महाराष्ट्र सरकारने देखील मदत जाहीर करत या मजुरांच्या जीवाची किंमत लावली आहे. आपल्या घरापर्यंत जाऊ द्या इतकीच या मजुरांची होती. मात्र, ती मागणी पूर्ण झाली नाही. रस्त्यावर पोलीस पकडतात म्हणून, या लोकांनी रेल्वे रुळावरून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लोकांचा जीव अपघातात नाही झाला त्यांची या सरकारने हत्या केली असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
खासदार इम्तियाज जलील
औरंगाबादमध्ये हजारो प्रवासी अडकले आहेत आणि विशेष गाड्यांची व्यवस्था करुन त्यांना लवकरात लवकर आपापल्या राज्यात पाठवावे अशी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. रेल्वेमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र या चौकशीने काय होणार. गरीब परप्रांतीयांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निष्पाप लोकांचे प्राण गमावले असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला.