औरंगाबाद - मार्च ते ऑक्टोबरपर्यंत सर्व व्यवहार बंद होते. त्यात वीजबिल वाढून आले होते त्यावर सरकारने यावर काही तोडगा काढावा अशी विनंती आम्ही केली होती. मात्र, काही निर्णय झाला नाही, आता एक महिन्याचा अवधी देत आहोत. वीजबिलात पन्नास टक्के सूट द्या, अन्यथा महाराष्ट्रातील कोणतेही नागरिकांनी वीज बिल भरू नये, असे आवाहन आम्ही करू, असा इशारा एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
'...अन्यथा नागरिकांना वीजबिल भरण्यापासून रोखू' - खासदार इम्तियाज जलील बातमी
धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत आम्ही आंदोलन केले. त्यावेळी लवकर निर्णय घेऊ, असे शिवसेनेने सांगितले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही तर दुसरीकडे बार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे कोरोना फक्त धार्मिक स्थळांमध्येच पसरतो का, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
खासदार इम्तियाज जलील
Last Updated : Oct 6, 2020, 5:30 PM IST