महाराष्ट्र

maharashtra

निर्णयाचे स्वागत, सरकारलाही जनभावना कळाली आहे - खा. इम्तियाज जलील

By

Published : Mar 31, 2021, 2:55 AM IST

Updated : Mar 31, 2021, 6:29 AM IST

नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच आहे. या निर्णयाचे मी खासदार म्हणून स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

MP imtiaz jaleel reaction on aurangabad lockdown postponed Decision
निर्णयाचे स्वागत, सरकारलाही जनभावना कळाली आहे - खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद -जिल्ह्यात लॉकडाऊन बुधवारपासून सुरु होणार होते. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यासमोर दहा दिवस कसे पोट भरायचे? हा प्रश्न होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड घाबरलेले होते. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच आहे. या निर्णयाचे मी खासदार म्हणून स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

खासदार इम्तियाज जलील बोलताना...
सरकारला जनभावना कळाली
प्रशासनाने नागरिकांचे प्रश्न विचारात न घेता लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. यामुळे बुधवार होणाऱ्या मोर्च्यात लाखोंची संख्या असणार होती. यामुळे सरकारलाही हे कळालेले आहे की, लॉकडाऊन बाबतीत जनतेची भावना काय झालेली आहे. प्रशासनाने हा निर्णय घेतला नसता तर लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असते आणि हे संपूर्ण देशाने बघितले असते. निर्णय घेणाऱ्यांना ही इंटेलिजन्स रिपोर्ट आला होता. या मोर्चात लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे यापुढचा निर्णय घेतांना नक्कीच या गोष्टीचा विचार करतील. यापुढे मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विचारत घेऊन निर्णय घ्यावा. या देशात लोकशाही आहे. यामुळे निर्णय घेताना लोकांची भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. त्यांच्या निर्णयाला आम्ही सहकार्य करू. मात्र मुंबईचे एखादा अधिकारी माझ्या जिल्ह्याचा निर्णय घेऊ शकत नाही. जर अस झालं तर नक्कीच खासदार म्हणून माझा या निर्णयाला विरोध असणार आहे, असे देखील जलील म्हणाले.
आक्रोश मोर्चा रद्द

जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या कडक लॉकडाऊनला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शविला होता. प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र प्रशासन या निर्णयावर ठाम होते. यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी पैठण गेट येथून आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्याचा निर्णय घेतला होता. आता प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय स्थगित केला आहे. यामुळे मोर्चा देखील रद्द करण्यात आला असल्याची माहिती जलील यांनी दिली.

जिल्हाधिकारी काय म्हणाले...

औरंगाबाद जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी मंगळवारी उशिरा रात्री (दि.30) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ही माहिती दिली.


हेही वाचा -प्रशासनाने अडवलं तरी आंदोलन होणार - खासदार जलील यांचा इशारा

हेही वाचा -औरंगाबादमधील लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Last Updated : Mar 31, 2021, 6:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details