महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजचे आंदोलन स्थगित पण...खासदार जलील यांनी दिला 'हा' इशारा - mp Imtiyaz Jaleel agitation in aurangabad

आज आंदोलन मागे घेण्यात आले पण, भविष्यात वेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील

By

Published : Sep 2, 2020, 3:19 PM IST

Updated : Sep 2, 2020, 6:39 PM IST

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांना मस्जिदमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काहीवेळाने त्यांना नोटीस बजावत सोडून देण्यात आले. आज पुरते हे आंदोलन थांबले, तरी मात्र यापुढे आम्ही पुन्हा आंदोलन करू. मात्र, त्यावेळी आंदोलन वेगळ्या स्वरूपात असेल. आज आम्ही फक्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

बोलताना खासदार इम्तियाज जलील व पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद
राज्यातील धार्मिक स्थळ सुरू करा या मागणीसाठी एमआयएमचे खासदार यांच्या जलील यांनी सरकारला इशारा दिला होता. 1 सप्टेंबरला राज्यातील मंदिर आणि 2 सप्टेंबरला मस्जिद उघडू, अशी घोषणा इम्तियाज जलील यांनी केली होती. 1 सप्टेंबरला औरंगाबादचा खडकेश्वर मंदिरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसेना आणि एमआयएम आमने-सामने आले होते. त्यानंतर आज (2 सप्टें) इम्तियाज जलील यांनी दुपारी एक वाजता शहागंजच्या मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण करु, असे घोषित केले होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी जलील यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.शहागंज मशिदीजवळ सकाळपासूनच पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. इतकच नाही तर इतकंच नाही तर मस्जिद जवळ येणारे सर्व मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेट टाकून मार्ग बंद केले होते. दरम्यान, अनेक कार्यकर्ते मस्जिद परिसरात दाखल झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच इम्तियाज जलील यांना त्यांच्या कार्यालयाजवळू पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयात जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना नोटीस देऊन थोड्यावेळाने सोडूनही देण्यात आले.

पोलिसांच्या ताब्यातून सुटका होत असताना खासदार जलील यांनी हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी होते. आज जरी आम्ही आंदोलन थांबवले असले, तरी भविष्यात हे आंदोलन मोठ्या स्वरुपात उभे राहू शकते. धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी फक्त एमआयएमची नसून राज्यातील सर्वच नागरिकांची आहे. आज जरी औरंगाबादेत हे आंदोलन थांबले असले तरी राज्यातील इतर ठिकाणी हे आंदोलन सुरू होऊ शकते. त्यामुळे आता राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. आज आम्ही आंदोलन स्थगित केले असले तरी यापुढे कोणत्याही क्षणी आम्ही मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करु शकतो, इशारा खासदार यांच्या यांनी दिला.

तर खासदार जलील यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. हे आंदोलन आज पुरते थांबले आहे. पुन्हा जर अशाप्रकारे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही वेगळ्या स्वरुपाची कारवाई निश्चित करु, अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. तर 1 सप्टेंबरला मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

हेही वाचा -माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन

Last Updated : Sep 2, 2020, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details