औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना जुन्या उजाळा देण्यात आला. मराठवाडा ऑटो क्लस्टरच्यानिमित्ताने मनोहर पर्रिकर औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांनी शहरातील उद्योगांची क्षमता ओळखली होती, असे ते म्हणाले. तसेच साधा, सरळ, शेवटपर्यंत काम करणारा माणूस गेल्याने अतिशय दुःख होत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शेवटपर्यंत काम करणारा नेता हरपला - खासदार खैरे - दिवंगत मनोहर पर्रिकर
औरंगाबाद नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होत. सैन्याच्या ताब्यात असलेली जमीन अधिग्रहण करणे गरजेचे होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी ती वाट मोकळी करून दिल्याची आठवण खासदार खैरे यांनी करून दिली.
औरंगाबाद शहर पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीसाठी परिचित आहे. क्लस्टरच्या आवारात असलेल्या प्रदर्शनात त्यांना औरंगाबाद येथील उद्योगांच्या उत्पादनांची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या माध्यमातून औरंगाबाद येथील उद्योगांची क्षमता ओळखली होती. आधी येथील अभियांत्रिकी उत्पादनांचा विचार करावा, असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं होते. औरंगाबाद येथील कंपन्यांना त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक फायदा झाला होता. संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या प्रक्रिया सोप्या करत आणि संरक्षण मंत्रालयाची निविदा प्रक्रिया, सशस्त्र दलांच्या उत्पादनांची माहिती या कार्यकाळात सहज उपलब्ध झाल्याने औरंगाबाद येथील कंपन्यांना संरक्षण क्षेत्रातील उत्पादने तयार करण्याची संधी मिळाली होती. एवढेच नाही तर औरंगाबाद नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होत. सैन्याच्या ताब्यात असलेली जमीन अधिग्रहण करणे गरजेचे होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी ती वाट मोकळी करून दिल्याची आठवण खासदार खैरे यांनी करून दिली.