गुरुकृपा ब्रिजवर गाड्यांना मेमो न लावता सोडून देण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर (वैजापूर) :मर्यादेपेक्षा जास्त वजन घेऊन जाणाऱ्या गाड्यांना पकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळेस वजन जास्त आढळून आलेले असताना देखील काही गाड्यांना सोडून देण्यात आले. तसेच ठराविक गाड्यांना मेमो देण्यात आला. मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर यांनी ह्या गाड्या सोडून दिल्या आहेत. यावेळी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक अधिकारी भ्रष्टाचाराबाबत चर्चा करत असताना दिसून येत आहे. यामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये गुरुकृपा ब्रिजवर घडली आहे.
काय आहे नेमका प्रकार : मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर अमोल खैरनार यांनी दिनांक 16 जून रोजी सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान, शुक्र पेट्रोलियम समोर वडगाव तालुका वैजापूर येथे गुरुकृपा वे ब्रीजवर तपासणी केली. यावेळी काही गाड्या ओव्हरलोड असताना देखील त्या सोडून दिल्या. मात्र काही गाड्यांना मेमो दिला आहे. सर्व गाड्या ओव्हरलोड असल्याकारणाने सर्व गाड्याना मेमो देणे गरजेचे होते. परंतु असे न करता या अधिकाऱ्याने काही गाड्या मेमो न लावता सोडून दिल्या.
अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी - ओव्हरलोड असलेल्या गाड्या गाडी क्रमांक MH 21BH 5922 , MH20EL0978, MH43U5854 कारवाईत या सर्व गाड्या ओव्हरलोड होत्या. गाड्यांचे वजन मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर अमोल खैरनार यांच्या समोर, त्यांनी वे ब्रिजवर घेतले. वजन केले असता सदर गाड्या ओव्हरलोड आढळून आल्या. परंतु त्यांनी मेमो फक्त MH43U5854 दिला आणि या MH 21BH 5922 , MH20EL0978 दोन्ही पण गाड्या मेमो न देता सोडून दिल्या. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
मोटार निरीक्षक यांनी दिली उडवाउडवीची उत्तरे: तक्रारदार राहुल लांडे यांनी या सर्व प्रकराची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली. तसेच मोटार निरीक्षक अमोल खैरनार यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी आधी फोन रिसिव्ह केला नाही. नंतर त्यांनी फोन रिसिव्ह करून सदरील माहिती देता येणार नाही असे सांगून, उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच नंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केला.
हेही वाचा -
- Action On Sand Mafia: वाळू माफियांवर कारवाई होणार, हायवाने कट मारल्यानंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांची ठोस भूमिका
- वाळू माफियांची मुजोरी; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर चालवला टिप्पर, घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी