औरंगाबाद - मातृदिवस आपल्या आईसाठी कृज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस असतो. आज कोरोनाच्या सावटाखाली अनेकांच्या माता आपले कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना कोरोनाची सावलीदेखील शिवायला नको यासाठी या माता दक्षता घेत आहेत. अशीच एक माता म्हणजे औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील. पाटील यांना पाच वर्षाचा एक मुलगा असून तो सतत अनेक प्रश्न विचारतो. त्यावळे त्याच्या प्रश्नाला उत्तर देताान अनेकवेळा अडचणी येतात. पण, त्याला समजेल अशा पद्धतीने त्याचा समाधान करण्याचा परत्न करते, अशी भावना पोलीस अधक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केल्या.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय या अधिकारी दाम्पत्याला अयमन नावाचा एक गोंडस मुलगा आहे. आई पोलीस अधिकारी असल्याने अयमन आणि मोक्षदा यांची भेट सहसा कर्तव्यावरुन काहीसा वेळ भेटल्यावरच होत असते. आई घरी आली की अयमन आईला घट्ट मिठी मारतो. अयमनने त्याच्या गोड आवाजात केलेला संवाद आईचा पूर्ण थकवा ताण घालवतो. कर्तव्यावर असताना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या मोक्षदा घरी गेल्यावर आई म्हणून आपल्या मुलाच्या प्रश्नांना उत्तरे देताना काही वेळा निरुत्तर होतात. कारण, अयमनला पडलेले प्रश्न हे त्याच्या वयाच्या पलीकडचे असतात.