महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात आढळले 1 हजार 333 अतिकुपोषित बालके - औरंगाबाद विशेष बातमी

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने 2 लाख 11 हजार मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये 0 ते 6 महिने वयोगटातील 17 हजार 424 मुलांचे तर 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 1 लाख 93 हजार 849 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 1 हजार 333 अतिकुपोषित बालके तर मध्यम कुपोषित 7 हजार 224 बालके आढळून आली. ज्यामध्ये गंगापूर भागात सर्वाधिक कुपोषित बालक आढळून आले. ज्यात अतिकुपोषित 161 तर मध्यम कुपोषित 1 हजार 84 बालके आढळून आली आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Sep 2, 2021, 7:30 PM IST

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1 हजार 333 अतिकुपोषित बालके आढळून आल्याची माहिती, महिला बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

माहिती देताना महिला बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून झाले सर्वेक्षण

जून, 2021 मध्ये जिल्हा परिषदेकडे 343 कुपोषित बालके असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अंगणवाडी सेविकेंच्या मदतीने जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आला. त्यासाठी विशेष वेळापत्रक तयार करण्यात आले. 411 पथके तयार करण्यात आली. ही पथके गावागावांमध्ये सर्वेक्षण सुरू केले. ज्यामध्ये बालकांची वजन आणि उंची मोजून त्याची माहिती गोळा करण्यास सुरू करण्यात आले. त्यामध्ये 1 हजार 333 अतिकुपोषित बालके आढळून आली आहेत. या बालकांसाठी सप्टेंबर महिन्यात विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती महिला बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

दोन लाख मुलांचे झाले सर्वेक्षण

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात 2 लाख 11 हजार मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये 0 ते 6 महिने वयोगटातील 17 हजार 424 मुलांचे तर 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 1 लाख 93 हजार 849 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 1 हजार 333 अतिकुपोषित बालके तर मध्यम कुपोषित 7 हजार 224 बालके आढळून आली. ज्यामध्ये गंगापूर भागात सर्वाधिक कुपोषित बालक आढळून आले. ज्यात अतिकुपोषित 161 तर मध्यम कुपोषित 1 हजार 84 बालके आढळून आली आहेत.

कुपोषण बाबत करणार जनजागृती

कोरोना काळात मुलांचे कुपोषणाबाबत माहिती गोळा करण्यात अडचणी आल्या. मात्र, जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताच जिल्हा परिषदेच्या वतीने ऑगस्ट महिन्यात कुपोषणाबाबत सर्वेक्षण केला. यामध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणात असल्याचे उघड झाल्यावर आता गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी कीर्तनाचा आधार घेतला जाणार आहे. स्तनपान लहान मुलांसाठी किती महत्वाचे आहे ते कसे उपोयोगी असते याबाबत ओव्या सादर करून अभियान राबवले जाणार आहे. लहान बाळाला जन्मल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये आईचे दूध भेटल्यास त्याचे अनेक आजार दूर होतात. पहिले सहा ते आठ महिने आईच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न बाळाला देऊ नये, आईचे दूध बाळाला अनेक आजारांपासून वाचवते. त्यामुळे कुपोषण दूर करण्यात मदत होईल यासाठी ही जनजागृती असल्याचे महिला बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

हेही वाचा - नवरदेवाची तीन किलोमीटर चिखलातून पायपीट, ईटीव्ही भारत'वर पहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details