अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी मिळेल - राम भोगले - ram bhogale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून गरिबांसाठी मदत जाहीर केली. ही मदत अप्रत्यक्षरीत्या उद्योगांवर अनुकुल परिणाम करणारी असेल तर अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी मिळेल, असे राम भोगले यांनी सांगितले.
औरंगाबाद- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या मदतीचे उद्योजकांनी स्वागत केले आहे. बुधवारी आणि गुरुवारी केलेल्या मदतीमुळे उद्योगांना उभारी मिळेल. ज्यात कर्ज न करता भांडवल उभे केले जाईल आणि ही बाब उद्योगांसाठी फायद्याची राहील, असे मत प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून गरिबांसाठी मदत जाहीर केली. ही मदत अप्रत्यक्षरीत्या उद्योगांवर अनुकुल परिणाम करणारी असेल तर अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी मिळेल, असेदेखील राम भोगले यांनी सांगितले.
उद्योगांसाठी तीन लाख कोटींची मदत महत्वाची ठरेल. शेअर बाजारात कमी कार्यक्षमता असलेल्या उद्योगांनादेखील याचा फायदा होईल. अडचणीत आलेल्या उद्योगांना कर्ज उभे करण्यासाठी किंवा ते करत असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकार दहा हजार कोटी आणि 50 हजार कोटी फंड ऑफ फंडच्या माध्यमातून उभारले जात आहे, ही चांगली बाब आहे. कर्ज न घेता भांडवल उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारने गरीब आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेल्या पैशांमुळे क्रयशक्ती वाढणार, असे मत प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.