औरंगाबाद - शहरातील बिडकीन येथे पोलिसांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यासाठी जमा झालेल्या लोकांना हटकल्यावरून पोलिसांवरच हल्ला केल्याची खळबळजनक घटना बिडकीनमध्ये घडली. यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.
औरंगाबादेत जमावाकडून पोलिसांवर हल्ला, सामूहिक नमाज पठण करण्यास केला होता मज्जाव - बिडकीन पोलिसांवर हल्ला
कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्याने सामूहिकरित्या कुठेही धार्मिक कार्यक्रम करू नये, असे आवाहन सरकारने आणि धर्मगुरूंनी केले आहे. मात्र, काहीजण या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय औरंगाबादच्या बिडकीन येथे दिसून आला.
कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्याने सामूहिकरित्या कुठेही धार्मिक कार्यक्रम करू नये, असे आवाहन सरकारने आणि धर्मगुरूंनी केले आहे. मात्र, काहीजण या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय औरंगाबादच्या बिडकीन येथे दिसून आला. सोमवारी रात्री सामूहिक नमाज पठण करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यावर जमावाने पोलिसांवर हल्ला केला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रकाश नगरमध्ये मुस्लीम समाजातील काहीजण धार्मिकस्थळी सामूहिक नमाज पठण करत असल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांना नमाज पठण करणाऱ्या लोकांना विचारपूस केली असता, जमावाने थेट हल्ला चढवत दगडफेक सुरू केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सहाय्यक फौजदार बाबासाहेब दिलवाले, पोलीस नाईक सोनवणे मेजर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.