औरंगाबाद -औरंगाबादमध्येमनसे पदाधिकाऱ्यांनी पी.एफ.आय.कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला ( MNS workers attempt to break PFI office ) आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांनी कार्यकर्त्यांसह पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. किराडपुरा भागात असलेल्या पीएफआयच्या गडात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी राडा ( Angry MNS workers ) घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांना तब्यात ( MNS officials and activist detained ) घेतले. झालेल्या गोंधळात आढळलेले झेंडे, रंग, इत्यादी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.
MNS Aurangabad PFI : औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय मनसेकडून फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात - MNS officials and activist detained
औरंगाबादमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी पी.एफ.आय.कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला ( MNS workers attempt to break PFI office ) आहे. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांनी कार्यकर्त्यांसह पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. किराडपुरा भागात असलेल्या पीएफआयच्या गडात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी राडा ( Angry MNS workers ) घालण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबादमधून 3 जण घेतले ताब्यात -दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. ज्यात औरंगाबादच्या पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर सुद्धा एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई केली. कारवाईत पथकाने एकूण तीन जणांना ताब्यात घेतले ( Police Took Three Into Custody ) आहे. ज्यात नॅशनल कॉलनीतून सय्यद फ़ैसल, बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख इरफान आणि परवेजज खान याला बायजीपूरा येथून ताब्यात घेतले आहे. एटीएस आणि एनआयएच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास औरंगाबादच्या जिन्सी भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापा टाकला होता.