औरंगाबाद - महाराष्ट्र पब्लिक स्कूल, दौलताबाद येथील मराठी माध्यम विभागाचे ९ वी व दहावीचे वर्ग बंद करण्याच्या शाळा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पालकांसोबत मनसे आक्रमक झाली आहे.
हेही वाचा -औरंगाबादकरांनी अनुभवला झिरो शाडो-डे
औरंगाबाद - महाराष्ट्र पब्लिक स्कूल, दौलताबाद येथील मराठी माध्यम विभागाचे ९ वी व दहावीचे वर्ग बंद करण्याच्या शाळा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पालकांसोबत मनसे आक्रमक झाली आहे.
हेही वाचा -औरंगाबादकरांनी अनुभवला झिरो शाडो-डे
दौलताबाद येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या शाळा प्रशासनाने ९ वी व १० वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालक संतप्त झाले आहेत. दहावी हे वर्ष महत्वाचे असल्याने हा वर्ग बंद केल्यास विद्यार्थ्यांचे मनोबल खचेल. मुलांचे प्रवेश ऐनवेळी कुठे करायचे, असे प्रश्न असल्याने पालक चिंतेत आहेत. ९ वी आणि १० वीचे वर्ग बंद करू नका, अशी विनंती पालकांनी केली आहे.
महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या पालकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मनसेच्या शिष्टमंडळाने शाळेत धडक दिली व शाळेसमोर जमलेल्या सर्व पालकांसोबत चर्चा करून शाळेच्या या आडमुठी निर्णयाचा विरोध केला. तसेच शाळा अशा प्रकारे कोणतेही वर्ग बंद करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही व अशी जर शाळेची जबरदस्ती असेल आणि शाळा जबरदस्तीने विद्यार्थ्याला टीसी देत असेल, तर मनसे पालकांसोबत शाळेविरोधात लढा देण्यास खंबीर आहे, असे यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाला सांगण्यात आले व पालकांच्या वतीने शाळेला निवेदनही देण्यात आले. यावेळी मनसे शिक्षक सेनेचे राज्य सचिव सुभाष मेहेर, बिजू मारक, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, अशोक म्हस्के पाटील, मच्छिंद्र मोरे, सागर कुंटे, अनिकेत ठोकळ, नागेश देशमुख, राजेश इंगळे व विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हेही वाचा -भविष्य निर्वाह निधी अपहार प्रकरणी खंडपीठाची राज्य शासनाला नोटीस