औरंगाबाद - अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात ( Kannada Ghat ) पोलीस ट्रक चालकांकडून पैसे वसुली करत असल्याची तक्रार चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan ) यांना मिळाली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी याची गंभीर दखल घेत वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन ( Sting Operation ) केले. आणि लाखचोर पोलिसांची ( Corrupt Police ) पोलखोल केली. भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी लाचखोर पोलिसांची केली पोलखोल ...अन् पोलिसांनी काढला पळ -
कन्नड घाटात ट्रक चालकांची ( Truck Driver ) लूट होत असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः अजवड ट्रक चालवला. तो ट्रक कन्नड घाटात नेला. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली. त्यावर पैसे थोडे कमी करा असे सांगत 500 रुपये पोलिसांच्या हातात दिले आणि बाकी पैसे परत मागितले. मात्र पोलिसाने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यानंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात केली. काही पोलिसांनी आमदारांना ओळखले त्यानंतर तिथून पळ काढला.
आमदार मंगेश चव्हाण ट्रक चालवताना वाहन चालकांची होत आहे लूट...
कन्नड घाटात दुरुस्ती सुरू असल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंदी ( Heavy Vehicles Banned ) आहे. मात्र पोलिसांकडून वाहन चालकांकडून 500 ते 1000 रुपये प्रति अवजड वाहन वसूल केले जात आहे. अनेकदा घाटात वाहतूक खोळंबते. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिकेला (Ambulance ) अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांचा खरा चेहरा समोर आणल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.