औरंगाबाद: तेलंगणाचे आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीला भेट देत फुलं वाहिली. त्यामुळे शिवसेना यावरून एमआयएमवर टिका करत राजकीय वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर -हैद्राबादच्या धरतीवर गरीब मुलांना शिक्षण मिळावं याकारिता हिमयात बाग परिसरात शाळा सुरु करण्यात येणार असून, शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गांला भेट ( Visit to Dargahs at Khultabad ) दिली. येथील मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb's tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.