कन्नड(औरंगाबाद)- कन्नड-सोयगाव वनक्षेत्रातील घाटमरी व वेताळवाडी परिसरात देवधारचा खोरा येथे एक शेतकऱ्याला शुक्रवारी बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले. सदर पिल्लू आईपासून चुकलेले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वन विभागाच्या बिटगार्डला संपर्क साधून माहिती दिली.
बिबट्याचे चुकलेले पिल्लू पुन्हा आईकडे सुखरूप; वन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
नक्षेत्रातील पाणवठे परिसरात बिबट्यांच्या पायांचे ठसे,विष्ठा शोधून अंदाज बांधत शनिवारी पिल्लाला दूध पाजून ट्रॅप कॅमेरा त्यावर सुरू ठेवला. सायंकाळी सहा वाजल्यानंतर मादी बिबट्याने दोन पिल्लासह येथे येऊन हरवलेल्या पिल्लाला मायेने आपल्यात सामावून घेतले.
बिबट्याच्या पिल्लाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासून ज्या ठिकाणी मिळाले त्या ठिकाणी कॅरेटमध्ये ठेवले. मात्र, दुसऱ्या दिवशीही पिल्लू तेथेच आढळून आल्याने वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर सदर पिल्लू त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले.
कन्नड येथील सहाय्यक वन संरक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात एम. ए. शेख, मनोज कांबळे, प्रकाश सूर्यवंशी आदींनी वनक्षेत्रातील पाणवठे परिसरात बिबट्यांच्या पायांचे ठसे, विष्ठा शोधून अंदाज बांधत शनिवारी पिल्लाला दूध पाजून ट्रॅप कॅमेरा त्यावर सुरू ठेवला. सायंकाळी सहा वाजल्यानंतर मादी बिबट्याने दोन पिल्लासह येथे येऊन हरवलेल्या पिल्लाला मायेने आपल्यात सामावून घेतल्याने वनविभागच्या प्रयत्नाला यश आले.