औरंगाबाद - मनसेचे अगोदर मराठी मराठी होतं. आता भोंगा भोंगा होत आहे. कमळासोबत भुंग्याचे नाते होते. आता कमळासोबत भोंग्याचे नाते आहे. हा भोंगा कमळाला किती त्रास देतो हे कळेल. सुपारी सभा राज्याने खूप पहिल्या आहेत, अशी टिका शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यांनी मनसेवर केली. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे.
Subhash Desai on Raj Thackeray : आधी कमळासोबत भुंग्याचे आता भोंग्याचे नात आहे - सुभाष देसाई
कुणी कितीही चिथावणी दिली तरी शहरात काही होणार नाही, बंधुभाव कायम राहील. कोण काय करतंय याकडे जनता पाहते आणि बोध घेते. तसेच बाबरी पडली तेव्हा मुख्यमंत्री कुठं होते असे म्हणतात. बाळासाहेबांनी पतणाची जबाबदारी घेतली. विश्व हिंदू परिषदेसह संघाने सुद्धा हाथ झटकले होते, अशी टिका सुभाष देसाई यांनी केली.
शहरात बंधुभाव टिकून राहील - बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबाद पासून संभाजीनगर केले. लोकांच्या ते मनामनात आहे. शहरासोबत आमचे नात अभेद्य आहे. आता लोक कार्यक्रम घेताय. त्यांना घेऊ द्या. किती दिवस टिकतात ते पाहूया, अशी टिका सुभाष देसाई यांनी केली. त्याचप्रमाणे औरंगाबादेत काहीच होणार नाही. कुणी कितीही चिथावणी दिली तरी शहरात काही होणार नाही, बंधुभाव कायम राहील. कोण काय करतंय याकडे जनता पाहते आणि बोध घेते. तसेच बाबरी पडली तेव्हा मुख्यमंत्री कुठं होते असे म्हणतात. बाळासाहेबांनी पतणाची जबाबदारी घेतली. विश्व हिंदू परिषदेसह संघाने सुद्धा हाथ झटकले होते, अशी टिका सुभाष देसाई यांनी केली.