महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत - aurngaabaad

रविवारी सकाळी सावे यांचे औरंगाबाद शहरात आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.

अतुल सावे

By

Published : Jun 23, 2019, 5:14 PM IST

औरंगाबाद - उद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज रविवारी अतुल सावे पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात आले आहेत. यावेळी ढोल ताशे आणि फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.


अतुल सावे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म व अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्रिपद आहे. गेले आठवडाभर विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने त्यांना आपला तळ मुंबईतच ठोकावा लागला होता. रविवारी सकाळी सावे यांचे औरंगाबाद शहरात आगमन झाले आहे.

अतुल सावे


सावे यांनी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत शहरात प्रवेश केला. वाहन रॅलीद्वारे शहिदस्तंभला अभिवादन केले. पुढे क्रांतिचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तेथून रॅली शहरात पुढे गेली.


यावेळी मराठवाडा विकास महामंडळचे अध्यक्ष डॉ. भगवंत कराड, शहरअध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर, नगरसेवक राज वानखेडे, प्रमोद राठोड, माजी नगरसेवक अनिल मक्रिये, जिल्हा चिटणीस संजय फत्तेलष्कर, जिल्हा चिटणीस राजेंद्र कचरे, अभिजित जिरे, कैलास पुसे यांच्या सह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

ABOUT THE AUTHOR

...view details