औरंगाबाद- राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्ली येथे केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चांगलंच वादळ निर्माण झाला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे पूल बांधण्यात सक्षम आहेत, कुठे कसा पूल बांधायचा त्यांना माहिती आहे. त्यामुळे सेना-भाजपमधला पूल तेच बांधू शकतात, असे विधान त्यांनी दिल्लीत ( Abdul Sattar on Sena BJP Alliance ) केले.
युतीबाबत निर्णय उद्धव ठाकरे घेतील
औरंगाबाद-जळगाव महामार्ग विषयी अडचणी सोडण्याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची दिल्लीत भेट ( Abdul Sattar Nitin Gadkari Meet ) घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गडकरी यांची स्तुती केली. रस्ते कसे बांधायचे आणि पूल कसे उभारायचे हे गडकरी यांना चांगलेच माहिती आहे. कधी कोणता पूल बांधण्याचा यांचा ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे सेना-भाजपमधील पूल तेच बांधू शकतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जर युतीबाबत बोलणी केली ( Abdul Sattar on Sena BJP Alliance ), तर निश्चितच मार्ग निघू शकतो. याबाबत सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.