महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दलित मतांसाठी आम्हाला नेत्यांची गरज नाही - इम्तियाज जलील - प्रकाश आंबेडकर

वंचितने दिलेल्या आठ जागा मान्य नसल्याने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर एमआयएमने मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. रोज चार ते पाच जिल्ह्यामधील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्याच दिवशी उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

इम्तियाज जलील, खासदार एमआयएम

By

Published : Sep 10, 2019, 6:27 PM IST

औरंगाबाद- आम्हाला दलित मत मिळवण्यासाठी कोणत्या नेत्याची गरज नाही, राज्यातील दलित आणि मुस्लीम बांधव ओवेसी यांच्या मागे असून निवडणुकीत ते दिसेल, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे.

इम्तियाज जलील, खासदार एमआयएम

हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

वंचितने दिलेल्या आठ जागा मान्य नसल्याने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर एमआयएमने मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. रोज चार ते पाच जिल्ह्यामधील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्याच दिवशी उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

हेही वाचा - काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

लोकसभेत आपला प्रभाव दाखवल्यानंतर विधानसभेत चांगला निकाल अपेक्षित होता. आता आम्हाला आमची ताकत दाखवण्याची संधी होती. मात्र, वंचितने आणि प्रकाश आंबेडकरांनी आमची निराशा केली. आम्ही वंचितला 76 जागा मागितल्या होत्या, आता आम्ही ठरवू किती जागा लढवायच्या, आता आम्ही कमी किंवा जास्त जागा लढवू शकतो. वंचित मध्ये होतो म्हणून आमच्याकडे उमेदवार होते, असे नाही. इतर पक्षातील कार्यकर्ते आमच्याकडे उमेदवारी मागत असल्याचे जलील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details