औरंगाबाद- एमआयएम नगरसेवक अबु लाला हाश्मी यांनी सफाई कामगाराला मारहाण केल्या प्रकरणी आज शेकडो सफाई कर्मचऱ्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू करताच फिर्यादीच ठाण्यातून पसार झाला. त्यामुळे आरोपी सोडून फिर्यादीला शोधण्याची वेळ आज बेगमपुरा पोलिसांवर आली.
नगरसेवक आणि सफाई कर्मचाऱ्यातील वाद आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावाजवळ पालिका सफाई कर्मचारी इरफान शेख, फारुख शेख हे कचरा संकलित करत असताना त्या ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक अबू लाला हाश्मी यांनी येऊन शिवीगाळ करत मारहाण केली होती. या मारहाणीचा निषेध म्हणून आज पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले होते. कर्मचारी इरफान शेख यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात प्राथमिक स्वरूपाची तक्रार दिली आहे.
हेही वाचा - पोहण्यासाठी गेलेल्या चुलत भावंडाचा तलावात बुडून मृत्यू
दुपारपर्यंत पोलीस घटनेची सविस्तर माहिती घेऊन गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, तक्रारदार इरफान शेख हे पोलीस तक्रार घेत असतानाच कागदपत्र आणतो, असे म्हणत पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना वारंवार फोन करून पोलीस ठाण्यात बोलावले होते. दुपारपर्यंत तक्रारदार पोलीस ठाण्यात आले नव्हते. बेगमपुरा पोलिसांनी एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करताच सकाळ पासून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अकाडतांडव करणाऱ्या तक्रारदारसहसह शेकडो सफाई कर्मचऱ्यांनी अचानक काढता पाय घेतलयाने पोलिसांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. पोलिसांनी अनेक वेळा फिर्यादीला फोन केला. मात्र, त्यानंतर इरफान यांनी फोन बंद केला पोलिसांनी संध्याकाळपर्यंत वाट बघत शेवटी तक्रारदार येत नसल्याचा स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली. संध्याकाळपर्यंत बेगमपुरा पोलिसांवर आरोपी ऐवजी फिर्यादीला शोधण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - नाथसागर धरणाच्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह