महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी 'रझाकार' नाही तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम! ओवैसींचे, उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - uddhav thackeray

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी "मी रझाकार नाही तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम आहे." असे म्हणत औरंगाबादेतच प्रत्युत्तर दिले आहे.

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी

By

Published : Apr 20, 2019, 4:50 AM IST

Updated : Apr 20, 2019, 4:55 AM IST

औरंगाबाद - शक्रवारी शहरात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार्थ झालेल्या सभेत शिवसेना प्रमुख उद्घव ठाकरेंनी शिवशाही पाहिजे का रझाकारी पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी "मी रझाकार नाही तर शिवरायांचा सिद्धी इब्राहिम आहे." असे म्हणत औरंगाबादेतच प्रत्युत्तर दिले आहे.

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी

बीड बायपासवरील जबिंदा मैदानावर वंचित बहुजन आघाडी-एमआयएमचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जाहीर सभा घेण्यात आली. सभेत बोलताना औवैसी म्हणाले, दहशतवाद संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी भोपाळमधून मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपीला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. ती साध्वी प्रज्ञासिंग शहिदांचा अपमान करत असताना नरेंद्र मोदी तुम्ही गप्प कसे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, साध्वी प्रज्ञा सिंग मुर्दाबाद म्हणत शाहिद हेमंत करकरे यांना भरसभेत श्रद्धांजलीही वाहिली. तसेच, शहराला पाणी व कचऱ्याच्या समस्येपासून सोडवण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. प्रकाश आंबेडकर आणि मी सोबत लोकसभेत जाऊन संविधानाचे रक्षण करू. प्रकाश आंबेडकरांसोबत राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणणार असल्याचेही ओवैसी म्हणाले. इम्तियाज जलील यांनाच निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

औवेसींच्या नंतर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सभेची सुत्रे स्व:कडे घेत भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने जात किंवा धर्म न पाहता माणूस म्हणून उमेदवारी दिली. जातीचे मतदान नसले, की प्रस्थापित पक्ष उमेदवारी देत नाहीत. त्यामुळेच राज्यात 50-60 कुटुंबांच्या हातातच सत्ता आहे. ही घराणेशाही या निवडणुकीत मोडीत निघेलच. असा विश्‍वासही वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. मोदी खोटे बोलतात, हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी उघड केले आहे. इम्तियाज जलील निवडून आले म्हणजे प्रत्येकाला मानसन्मान मिळेल. आता जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. जनताच पैसे देत आहे. सभेला येऊन मतदानही करते आहे. यानिमित्ताने लोकशाही रुजतेय हे लक्षात घ्या. त्यामुळे कुणाच्या चिथावणीला बळी पडू नका, असे आवाहनही प्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
तसेच, सभेला आ. वारीस पठाण, भारिपचे अमित भुईगळ, डॉ. गफ्फार कादरी, जालना लोकसभेचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे, आमदार इम्तियाज जलील, जावेद कुरेशी, अरुण बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Last Updated : Apr 20, 2019, 4:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details