औरंगाबाद -चेलीपुरा जवळील मतदान केंद्राबाहेर एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्ती करत दोन्ही गटांना पांगविल्याने सध्या तणाव निवळला आहे.
औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले - Maharashtra assembly polls live polls
दुपारच्या सुमारास शहरातील चेलीपुरा जवळील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. या घटनेची अफवा शहरात पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जमावाला मध्यस्ती करत पांगविले.
हेही वाचा -पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; सहा जण जखमी
दुपारच्या सुमारास शहरातील चेलीपुरा जवळील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. या घटनेची अफवा शहरात पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जमावाला मध्यस्थी करत पांगविले. यामुळे पुढील अनर्थ टळला. शहरात उठत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही साहायक आयुक्त हनुमंत भापकर यांनी केले आहे.