औरंगाबाद -राज्यातील महानगर पालिकेच्या महापौरपदांसाठी आरक्षण सोडत बुधवारी पार पडणार आहे. याबाबतचे पत्र औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांना मंगळवारी प्राप्त झाले आहे. राज्यातील महापालिकांची संख्या सध्या 27 आहे आणि त्यांची सोडत मुंबई मध्ये दुपारी तीन वाजता पार पडणार आहे.
राज्यातील महापौरपदांसाठी आरक्षण सोडत बुधवारी हेही वाचा - सर्वसमावेशक कार्यक्रमानंतरच होणार राज्यात 'महाशिवआघाडी'
पुढील काही महिन्यात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका या जाहीर होणार आहेत. त्या महानगरपालिकांचे निवडणुकीआधी महानगरपालिकांच्या महापौर पदाकरिता आरक्षण सोडत बुधवारी दुपारी काढण्यात येणार आहे. मंत्रालयात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत ही काढली जाणार आहे. याबाबतचे पत्र अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना पाठवले आहे. मुंबई येथे मंत्रालयात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत बैठक काढण्यात येणार आहे.
शासनाने काढलेल्या पत्राकानुसार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत महापौर पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांची देखील सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापौरपदाचा आरक्षण सोडत कशा पद्धतीने होते त्यानुसार आगामी निवडणुकीत अनेक उमेदवारांची महापौर पदासाठी मोर्चेबांधणी आतापासून सुरू होईल अस दिसत आहे.
हेही वाचा - राष्ट्रपती राजवट म्हणजे 'ह्या' नतद्रष्टांनी केलेला महाराष्ट्राचा घोर अपमान