औरंगाबाद- शहरात विविध वॉर्डात मुख्य जलवाहिनीवर ज्या नागरिकांनी नळ कनेक्शन घेतले असतील त्यांनी येत्या तीन दिवसात ते स्वतः काढावे. असे न केल्यास पोलीस सोबत घेऊन मुख्य जलवाहिनीवरून जोडणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा स्पष्ट इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे. यासह या बैठकीत ८ दिवसांत वितरण व्यवस्थेत असलेले दोष दूर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्य जलवाहिनीवरील कनेक्शन तोडा, अन्यथा पोलीस सोबत घेऊन गुन्हे दाखल करू - महापौर घोडेले - वसाहत
निवासी वसाहतींमध्ये पिण्याचे पाणी देण्याकरता आम्ही प्राधान्य देणार आहोत. तसेच संपूर्ण शहरात समान पाणीवाटप करण्यासंबंधी आयुक्त, अधिकारी यांना सूचनादेखील केल्या आहेत. अपव्यय करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. हे सर्व दोष येत्या ८ दिवसांत दूर करण्यास सांगितले असून ८ दिवसानंतर पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. त्यात सुधारणा न दिसल्यास पुढे काय करायचे ते ठरवू, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.
निवासी वसाहतींमध्ये पिण्याचे पाणी देण्याकरिता आम्ही प्राधान्य देणार आहोत. तसेच संपूर्ण शहरात समान पाणीवाटप करण्यासंबंधी आयुक्त, अधिकारी यांना सूचनादेखील केल्या आहेत. अपव्यय करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. हे सर्व दोष येत्या ८ दिवसांत दूर करण्यास सांगितले असून ८ दिवसानंतर पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. त्यात सुधारणा न दिसल्यास पुढे काय करायचे ते ठरवू, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.
पूर्वी ३५ एमएलडी पाणी सिडको परिसराला जात होते. तेव्हा २ दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आजच्या परिस्थितीत ३६ एमएलडी पाणी जात असतानाही नेमकी, अशी परिस्थिती का उद्भवली ? यामागे यंत्रणेत कुठे दोष आहे का ? ते शोधण्याचेही महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.